Talha Saeed Anti India Speech: ‘दिल्ली कोणाची होती?’ लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी तलहा सईदने भारतावर ओकली गरळ; असिम मुनीरवर उधळली स्तुतिसुमने

पाकिस्तानमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद याने भारताविरोध चिथावणीखोर, भडकाऊ वक्तव्ये केली.

Talha Saeed Anti India Speech: ‘दिल्ली कोणाची होती?’ लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी तलहा सईदने भारतावर ओकली गरळ; असिम मुनीरवर उधळली स्तुतिसुमने

Hafiz Saeed Son Lashkar Terrorist Talha Saeed Anti India Speech: लष्कर-ए-तैयबा (LeT) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद याने पुन्हा एकदा भारतविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्याने थेट भारताच्या नेतृत्वाला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. भारत आणि अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेल्या तलहाने, जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत भारताविरोधात जिहाद आणि कुर्बानीचा मार्ग सुरूच ठेवणार असल्याची शपथ घेतली.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामध्ये दहशतवाद्याचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय, हाफिज सईदचे अनेक नातेवाईक ठार झाले होते. यानंतरही हाफिज सईदच्या मुलाच्या या वक्तव्यातून पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादाचे शेपूट सरळ झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, भविष्यात आणखी दहशतवादी कारवाया सुरू राहण्याचे चिन्ह दिसत आहे.

इतिहास अन् दिल्लीचा उल्लेख करत चिथावणीखोर विधान
आपल्या भडकाऊ भाषणात तलहा सईदने मध्ययुगीन इतिहास आणि दिल्लीच्या सत्ताकारणाचा दाखला देत चिथावणी दिली. ‘दिल्लीच्या गादीवर बसलेले भारतीय नेते कशाच्या आधारे पाकिस्तानविरुद्ध बोलतात? त्यांना दिल्लीचा इतिहास आणि हा संपूर्ण भूभाग कोणाचा होता याचा विसर पडला आहे का?’, असा सवाल करत त्याने भारतीय उपखंडात मुस्लिमांनी 500 वर्षे राज्य केल्याचा दावा केला. आपण इतिहासाशी विरोधाभास असणारे किंवा तथ्यहीन विधान करत नसल्याचे सांगत त्याने दिल्लीवर पुन्हा हक्क सांगण्याचा अजब आणि चिथावणीखोर आव आणला.

हेही वाचा – Rajnath Singh: संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा; सैन्यदलांसाठी 1.10 लाख कोटींच्या लष्करी खरेदीला मंजुरी

पाकिस्तानातील लष्करप्रमुख असिम मुनीरवर स्तुतिसुमने
भारतविरोधी गरळ ओकतानाच तलहाने पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. पाकिस्तानला कुराण पाठ असणारे (हाफिज) लष्करप्रमुख मिळाले बद्दल त्याने ईश्वराचे आभार मानले. तसेच अलिकडेच पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्किये या देशांमध्ये पार पडलेल्या त्रिपक्षीय संरक्षण कराराचे त्याने स्वागत केले. यावरून पाकिस्तानातील सरकार, लष्कर आणि तेथील दहशतवादी संघटनांमधील घट्ट नाते पुन्हा एकदा जगासमोर उघडे पडले आहे.

राजकीय आघाडी आणि दहशतवादी भरतीचा कट
पाकिस्तानच्या न्यायाधीकरणाने कागदोपत्री हाफिज सईदला शिक्षा सुनावल्याचा दावा केला असला, तरी त्याचा मुलगा तलहा सईद पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात उघडपणे रॅली काढत आहे. मरकजी मुस्लिम लीग (MML) या राजकीय पक्षाच्या आडून लष्कर-ए-तैयबासाठी कार्यकर्त्यांची आणि तरुणांची भरती करण्याचा कट रचला जात आहे. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांच्या (ISI) छुप्या पाठिंब्यामुळेच हे आंतरराष्ट्रीय दहशतवादी उघडपणे फिरून भारताविरोधात चिथावणीखोर भाषणे देत असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा – US Birthright Citizenship: अमेरिकेत जन्म-आधारित नागरिकत्वाच्या नियमात बदल; परदेशी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी नवीन धोरण जाहीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number